शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

रक्तदान चळवळ वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा असाही वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:52 AM

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.

ठळक मुद्देअमळनेर येथील मनोज शिंगाणे या युवकाचा युवादिनानिमित्त संकल्पआतापर्यंत साडेतीनशेवर गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिलेआवश्यक रक्त, चळवळ संपूर्ण महाराष्टÑात उभारणार

संजय पाटील ।अमळनेर, जि.जळगाव : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.साधारणत: दीड वर्षांपूर्वी एका लहान मुलीला तातडीने रक्ताची गरज होती. पालक केविलवाण्या स्वरूपात फिरत असताना मनोज शिंगाणे यांनी सोशल मीडियावर संदेश टाकला आणि काही वेळात रक्त उपलब्ध झाले. त्या दिवसापासून शिंगाणे यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर होऊ शकते हे ओळखून युवकांचा ग्रुप तयार केला. त्यांच्या रक्तगटाची माहिती ठेवली आणि हळूहळू तिनशेवर युवक जोडले गेले. शहरातील खासगी अथवा सरकारी दवाखान्यात गंभीर रुग्ण आला की तातडीने मनोज शिंगाणे याना फोन येतो. तत्काळ सोशल मीडियावर संदेश जाताच अवघ्या १० ते १५ मिनिटात रक्त देणारी व्यक्ती पतपेढीत पोहचते. अगदी मृत्यूच्या दाराशी पोहचलेल्या व्यक्तींना वेळेवर रक्त मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.या चळवळीचे कार्य शिरपूर, चाळीसगाव, धुळे, चोपडा आदी परिसरात पोहचले आणि त्या ठिकाणी असलेल्या रक्तपेढ्या व युवक जोडले गेले. अमळनेरचे गंभीर रुग्ण धुळ्याला पाठवले जातात. त्यांना रक्त लागल्यास शिंगाणे सोशल मीडियावर संदेश पाठवून धुळ्यातच रक्त उपलब्ध करून देतात. मुंबई, पुणे येथे गेलेल्या रुग्णांनादेखील त्यांनी तेथील खान्देशी व्यक्तींकडून ऐनवेळी रक्त उपलब्ध केले आहे.भरकटलेल्या तरुणाईला मार्गदर्शकओ निगेटिव्ह, बी निगेटिव्ह यासारखे दुर्मीळ ग्रुपचे रक्त मिळणे अवघड असते. मात्र पर्यायी रक्तदाता उपलब्ध करून त्या गटाची पिशवी लगेचच मिळवून देतात. त्यामुळे रुग्णावर उपचार अथवा शस्रक्रिया करण्यास अडचण येत नाही. भरकटलेल्या तरुणाईला सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करावा, हे मनोज शिंगाणे उत्तम उदाहरण म्हणावे लागणार आहे.रुग्णाला वेळीच उपचार मिळतात आणि अशा बिकटप्रसंगी नातेवाईकांची ससेहोलपट होऊ न देता, त्यांची होणारी धावपळ व हाल थांबतात; यातच समाधान आहे. तीन-चार तालुक्यांच्या ग्रुपशी जोडलो गेलो आहे. चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर उभारण्याचा संकल्प आहे.-मनोज शिंगाणे, अमळनेर

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर