रक्तदान चळवळ वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा असाही वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:52 AM2020-01-12T00:52:18+5:302020-01-12T00:53:37+5:30

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.

Also use of social media to increase blood donation movement | रक्तदान चळवळ वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा असाही वापर

रक्तदान चळवळ वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा असाही वापर

Next
ठळक मुद्देअमळनेर येथील मनोज शिंगाणे या युवकाचा युवादिनानिमित्त संकल्पआतापर्यंत साडेतीनशेवर गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिलेआवश्यक रक्त, चळवळ संपूर्ण महाराष्टÑात उभारणार

संजय पाटील ।
अमळनेर, जि.जळगाव : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून त्यातून मोठी रक्तदान चळवळ उभारून मनोज शिंगाणे या अमळनेरच्या युवकाने आतापर्यंत अति गरजू सुमारे ३५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.
साधारणत: दीड वर्षांपूर्वी एका लहान मुलीला तातडीने रक्ताची गरज होती. पालक केविलवाण्या स्वरूपात फिरत असताना मनोज शिंगाणे यांनी सोशल मीडियावर संदेश टाकला आणि काही वेळात रक्त उपलब्ध झाले. त्या दिवसापासून शिंगाणे यांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर होऊ शकते हे ओळखून युवकांचा ग्रुप तयार केला. त्यांच्या रक्तगटाची माहिती ठेवली आणि हळूहळू तिनशेवर युवक जोडले गेले. शहरातील खासगी अथवा सरकारी दवाखान्यात गंभीर रुग्ण आला की तातडीने मनोज शिंगाणे याना फोन येतो. तत्काळ सोशल मीडियावर संदेश जाताच अवघ्या १० ते १५ मिनिटात रक्त देणारी व्यक्ती पतपेढीत पोहचते. अगदी मृत्यूच्या दाराशी पोहचलेल्या व्यक्तींना वेळेवर रक्त मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
या चळवळीचे कार्य शिरपूर, चाळीसगाव, धुळे, चोपडा आदी परिसरात पोहचले आणि त्या ठिकाणी असलेल्या रक्तपेढ्या व युवक जोडले गेले. अमळनेरचे गंभीर रुग्ण धुळ्याला पाठवले जातात. त्यांना रक्त लागल्यास शिंगाणे सोशल मीडियावर संदेश पाठवून धुळ्यातच रक्त उपलब्ध करून देतात. मुंबई, पुणे येथे गेलेल्या रुग्णांनादेखील त्यांनी तेथील खान्देशी व्यक्तींकडून ऐनवेळी रक्त उपलब्ध केले आहे.
भरकटलेल्या तरुणाईला मार्गदर्शक
ओ निगेटिव्ह, बी निगेटिव्ह यासारखे दुर्मीळ ग्रुपचे रक्त मिळणे अवघड असते. मात्र पर्यायी रक्तदाता उपलब्ध करून त्या गटाची पिशवी लगेचच मिळवून देतात. त्यामुळे रुग्णावर उपचार अथवा शस्रक्रिया करण्यास अडचण येत नाही. भरकटलेल्या तरुणाईला सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करावा, हे मनोज शिंगाणे उत्तम उदाहरण म्हणावे लागणार आहे.

रुग्णाला वेळीच उपचार मिळतात आणि अशा बिकटप्रसंगी नातेवाईकांची ससेहोलपट होऊ न देता, त्यांची होणारी धावपळ व हाल थांबतात; यातच समाधान आहे. तीन-चार तालुक्यांच्या ग्रुपशी जोडलो गेलो आहे. चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर उभारण्याचा संकल्प आहे.
-मनोज शिंगाणे, अमळनेर

Web Title: Also use of social media to increase blood donation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.