आर्थिक अडचणीतील गरजूंना मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:13 IST2021-06-20T04:13:42+5:302021-06-20T04:13:42+5:30

जामनेर : कोरोना संकाटात औषधोपचाराचाही खर्च भागू न शकणाऱ्या गरजूंना प्रतिमहिना ५०० रुपयांचे मानधन येथील गेंदाबाई लोढा प्रतिष्ठान देत ...

Allocation of aid to the needy in financial difficulties | आर्थिक अडचणीतील गरजूंना मदतीचे वाटप

आर्थिक अडचणीतील गरजूंना मदतीचे वाटप

जामनेर : कोरोना संकाटात औषधोपचाराचाही खर्च भागू न शकणाऱ्या गरजूंना प्रतिमहिना ५०० रुपयांचे मानधन येथील गेंदाबाई लोढा प्रतिष्ठान देत आहे. शनिवारी १०० गरजूंना मानधन वाटप करण्यात आले. जैन श्रीसंघ महामंत्री ईश्वरलाल साबद्रा यांच्या हस्ते या मानधनाचे वाटप करण्यात आले.

अध्यक्षस्थानी मनोज कावडिया होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा यांनी गेल्या दोन वर्षांतील कामाची माहिती दिली. संकटाळात प्रतिष्ठान करीत असलेल्या कामाचे कौतुक साबद्रा यांनी केले. यावेळी संदीप ललवाणी, संजय लखोटे, जितेंद्र पालवे, दीपक देशमुख, ॲड. विकास चौधरी, रतनसिंग राणा, वसिम शेख, शरीफ पिंजारी, आबूलाल शेख, गोपाल देशपांडे, वंदना लोढा उपस्थित होते.

फोटो ओळ: जामनेर येथे गरजूंना मानधन वाटप करताना ईश्वरलाल साबद्रा, संजय लखोटे सोबत विनोद लोढा व प्रतिष्ठानचे पदाधिकारी.

Web Title: Allocation of aid to the needy in financial difficulties