परसबागेसाठी बियाणे किट केले वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:42+5:302021-09-19T04:16:42+5:30
पाल, ता. रावेर : सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तसेच आयएफएफसीओ इंडिया आणि एकात्मिक ...

परसबागेसाठी बियाणे किट केले वाटप
पाल, ता. रावेर : सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तसेच आयएफएफसीओ इंडिया आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना रावेर यांच्या संयुक्त विद्यामाने पोषण वाटिका महाअभियान व वृक्षारोपण कार्यक्रम पाल येथे कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी परसबागेसाठी बियाणे किट वाटप करण्यात आले. तसेच गर्भवती महिलांना बेबी किट व मिल्क पावडर किट देण्यात आले. फळ झाडांची रोपेही वाटप केली.
अध्यक्षस्थानी साकेगाव आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा चौधरी होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा विकास मंडळ संस्थेचे सचिव अजित पाटील, आयएफएफसीओचे अधिकारी केशव शिंदे, महिला व बालविकास अधिकारी जागृती किसन तायडे, गोमती बारेला, कडू पाटील (किनगाव) तसेच एच. बी. तडवी, हर्षदा चौधरी, डॉ. रितेशकुमार चंदनवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्रप्रमुख महेश महाजन यांनी केले.
या वेळी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी महिलांना पोषण आहाराबाबत उपयुक्त माहिती दिली. त्यात संत्तू, राजगिरा लाडू, आळीव लाडू, नागली सत्व कसे बनवावे हे सांगितले. तायडे यांनी महिलांना विविध भाज्यांचे व आयोडीन मिठाचे महत्त्व पटवून दिले.
अतुल पाटील यांनी ज्वारी, बाजरी, रागी, नागली यातील पोषणतत्त्वे व त्यांच्या सुधारित जातींबाबत माहिती दिली.
रितेशकुमार चंदनवार यांनी वैयक्तिक स्वच्छता, डोळ्यांची स्वच्छता याबाबत माहिती दिली.
या वेळी मान्यवरांचे हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ. धीरज नेहेते यांनी केले. आभार केशव शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो पोषण वाटिका अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी महिलांना भाजीपाला बियाणे वाटप करताना डॉ. अरुण चौधरी, अजित पाटील, महेश महाजन, जयश्री तायडे आदी.