'With all ... then waterfront development' | ‘सबका साथ... फिरभी जलगाव भकास’
‘सबका साथ... फिरभी जलगाव भकास’

जळगाव : ‘चीड येते, चीड येते, आमदार म्हणण्याची चीड येते’, ‘सबका साथ अन् जळगाव भकास’ अशा घोषणा देत व खड्डयांमध्ये रांगोळ्या काढत शिवसेनेने खड्डयांचा समस्यावर सोमवारी अनोखे आंदोलन केले. शहरातील खड्डयांचा समस्येमुळे जळगावकर त्रस्त असताना, शिवसेनेने खड्डयांमध्ये रांगोळ्या काढून खड्डयांचा समस्येकडे प्रशासन व आमदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता शाहू नगर भागातील तपस्वी हनुमान मंदिरापासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, निलेश पाटील, राहूल नेतलेकर, सोहम विसपूते, चेतन प्रभुदेसाई, लोकेश पाटील, संतोष रायचंदे, मंगला बारी, शोभा चौधरी, मनिषा चौधरी, हितेश शहा, महेंद्र बागडे, बजरंग सपकाळे, विजय चौधरी आदी शिवसैनिक उभे होते.
घोषणांनी दणाणला शाहू नगर परिसर
तपस्वी हनुमान मंदिराकडून पिंप्राळा रेल्वेगेटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या खड्डयांमध्ये रांगोळ्या काढण्यात आल्या. यावेळी मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपुर्ण परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. प्रत्येक खड्डयांमध्ये रांगोळी काढून ‘सबका साथ अन् जळगाव भकास’ असे स्लोगन लिहून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान, जळगावकरांच्या जीव्हाळ्याच्या प्रश्नावर हे आंदोलन असल्याने रस्त्यावरुन वापरणाºया लोकांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेऊन शिवसेनेच्या आंदोलनाला पाठींबा दिला.

सामान्य नागरिकांनीही दिला पाठींबा
सेनेकडून रस्त्यांचा समस्येबाबत केलेल्या या आगळ्या-वेगळया आंदोलनाला सामान्य नागरिकांनीही पाठींबा दिला. अनेकांनी प्रशासन व सत्ताधाºयांनी खड्डयांचा समस्येपासून जळगावकरांचे होणारे हाल दूर करण्याची मागणी केली. या रस्त्यावरून जाणारे वाहनधारक देखील यावेळी थांबले होते.सामान्य नागरिकांमध्ये खड्डयांबाबत चीड असून आता नागरिकांचा सहनशिलतेचा बांध सुटला आहे. आज शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. उद्या प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासन व सत्ताधाºयांना पडता भुई सोडेल असे मत गजानन मालपुरे व पृथ्वीराज सोनवणे यांनी व्यक्त केले.

Web Title: 'With all ... then waterfront development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.