शिवरायांच्या विचारावर चालल्यास सर्व समस्यांचे निराकरण - रामपाल महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:13 IST2018-02-15T00:12:37+5:302018-02-15T00:13:05+5:30
जळगावात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने कीर्तन

शिवरायांच्या विचारावर चालल्यास सर्व समस्यांचे निराकरण - रामपाल महाराज
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १४ - जग वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे खरे रयतेचे राजे होते. त्यांच्या विचारावर चालल्यास आज भेडसावणाºया सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकेल, असा विश्वास सत्यपाल महाराज यांचे शिष्य शिवकीर्तनकार रामपाल महाराज यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात येत असलेल्या सप्ताहांतर्गत बुधवारी या कीर्तन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी रामपाल महाराज यांचा नगरसेवक संतोष पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मुकुंद सपकाळे, पुरुषोत्तम चौधरी, दीपक सूर्यवंशी, प्रतिभा शिंदे, शंभू पाटील, समीर जाधव यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी रामपाल महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची गाथा आपल्या कीर्तनातून मांडली. शिवरायांची महती ऐकताना उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. शिवरायांच्या विचाराचा अवलंब केल्यास कोणी कोणाचा द्वेश करणार नाही, गर्भातच मुलीचा बळी दिला जाणार नाही, कोणीही अन्न, वस्त्र, निवाºयाशिवाय राहणार नाही, दंगल कुपोषण, शेतकºयांच्या आत्महत्या हे सर्व प्रश्न शिवरायांच्या विचाराने मार्गी लागू शकतात, असेही रामपाल महाराज म्हणाले. या सोबतच त्यांनी ज्वलंत विषयावरही लक्ष वेधले.
संत गाडगेबाबा, संत तुडोजी महाराज यांची कीर्तनाची परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केले.