अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने डॉक्टरांना केले सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST2021-07-07T04:19:38+5:302021-07-07T04:19:38+5:30

ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमित साळुंखे व त्यांचे सहकारी यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते गुलाबपुष्प ...

All India Consumer Panchayat honors doctors | अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने डॉक्टरांना केले सन्मानित

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने डॉक्टरांना केले सन्मानित

ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमित साळुंखे व त्यांचे सहकारी यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते गुलाबपुष्प गुच्छ व कोरोना महामारी पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याशिवाय डॉ. प्रशांत सांगळे, डॉ.पंकज हर्णे, डॉ. समाधान पाटील, डॉ. कुणाल पाटील,डॉ. प्रशांत पाटील ,डॉ.मुकुंद सवनेरकर,डॉ.चारुदत्त खानोरे ऑर्थो सर्जन ,डॉ. मुकेश तेली,डॉ. दीपक चौधरी व डॉ.भूषण मगर, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ. अमित देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा कृषी समिती प्रमुख डॉ. एन. आर. पाटील,तालुका कृषी समिती प्रमुख अरुणा उदावंत, महिला संघटक निर्मला देशमुख,संघटक शरद गीते, सचिव संजय रतन पाटील, डॉ.अमित देशमुख आदी उपस्थित होते. प्रास्तविक संघटक शरद गीते यांनी तर सूत्रसंचालन अरुणा उदावंत,स्वागत व आभार सुरेश तांबे यांनी मानले.

Web Title: All India Consumer Panchayat honors doctors