शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सोशल मीडियावर अक्षय तृतीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 2:07 PM

लॉकडाउनमुळे उदभवलेल्या परिस्थितीची सोशल मीडियावर अक्षय तृतीयाची चर्चा झाली, त्याविषयी लोकमतच्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अमळनेर येथील वार्ताहर दिगंबर महाले...

सोशल मीडियावर अक्षय तृतीयासोशल मीडियाकडे वाढत असलेली क्रेझ आता पारंपरिक, सामाजिक आणि कौटुंबिक नाती बदलत आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारख्या सेवा तथा साइट वापरणार्‍या लोकांची संख्या सतत वाढत आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये किशोरपासून वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. दुर्गम भागातही फोर जी तंत्रज्ञान पोहोचल्यानंतर सोशल मीडिया वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोशल मीडिया आता समाज आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. विशेषत: फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप हे आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहेत. महानगरेच नाही तरअगदी लहान शहरांमध्येही सोशल मीडिया शिवाय दररोजच्या जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. आता सोशल मीडियामुळे आयुष्य खूप सोपे झाले आहे. यासह माहितीचा प्रवाहदेखील खूप वेगवान झाला आहे. देशात सध्या वाढत असलेल्या एकट्या कुटुंबाच्या युगात, संबंध मजबूत करण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया शहरी कुटुंबांमधील संबंधांची संस्कृती पुन्हा परिभाषित करीत आहे. परंतु सध्या, शहरे आणि खेड्यांमध्ये विभागलेली कुटुंबे (म्हणजेच जे लोक रोजगाराच्या संबंधात शहरात आहेत, परंतु त्यांच्या संयुक्त कुटुंबातील लोक गावात राहतात) त्यांच्यात या प्रकरणात संक्रमण चालू आहे.अक्षय तृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते. खान्देशातील आखाजी हा सण सर्वासाठी संपूर्ण बंधनमुक्तीचा दिवस असतो. या दिवशी स्त्री, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध या सर्वाना पूर्ण स्वातंत्र्य लाभते. विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांना आमरस आणि पुरणाची पोळी यासह सांजरी आणि शेवया अशा मिष्ठान्नांची सुस्ती येते. ह्यआगारीह्ण या प्रथेतून या दिवशी पूर्वजांप्रती श्रद्धा भाव व्यक्त केला जातो. विशेष म्हणजे पूर्वी हे सारे काही हृदयात स्मृती रुपी बंदिस्त असे. आता या सर्व बाबी इव्हेंट स्वरूप सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. पुरणपोळी टाकताना, आंब्याचा रस करताना, आंबे खाताना भरलेले तोंड, झोका खेळताना, पत्ते खेळताना आपल्या आप्तस्वकीयाना लाईव्ह दाखविले जाते किंवा क्लिप्स करून पाठविल्या जातात. व्हाट्सएपवर शुभेच्छांचाही भडीमार असतोच. अक्षय तृतीयेला खान्देशभर प्रत्येक ओसरीवर किंवा झाडांवर झोका बांधलेला आढळतो. आखाजी हा सण शेतकरी, शेतमजूर, पुरुष आणि स्त्रिया यांचा जसा आहे तसा तो शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बलुतेदारांचाही आहे. शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यांनी जीवन पार बदलून टाकले आहे. काळाच्या ओघात या आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे. खेडय़ांतील नोकरीनिमित्ताने इतरत्र पांगलेले आता घराकडे येऊ शकत नाहीत तर कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही जण येण्याचं टाळतात. मग सोशल मिडियाच्या माध्यमातून ही मंडळी आखाजीची अनुभूती घेते.माहिती संसाधनांचा विस्फोट झाला आहे. माहितीच्या दृष्टीने जग हे खेडे बनले आहे. या तंत्रज्ञानामुळे माणूस जगाशी जोडला गेला असला तरी तो संवादाअभावी घरापासून नजीकच्या मंडळींपासून लांब चालला आहे हेही तितकेच खरे आहे. शहरीकरण, कौटुंबिक कलह, महागाई, वेळेचा अभाव आणि सारे काही सोशल मीडियाच्या साहाय्याने उरकण्याच्या मानसिकतेमुळे नात्यांमध्ये जिव्हाळा राहिलेला नाही. जेथे नात्यांमध्येच औपचारिकता शिल्लक राहिली आहे तेथे सण, उत्सवांचा काय विचार करावा. गावगाडा, शेती व्यवसाय हे संक्रमण अवस्थेतून जात आहेत. साहजिकच कालानुरूप आखाजी सण साजरा करण्यातही आमूलाग्र बदल झाला आहे.वास्तव औरच असले तरी समाज माध्यमांवर सण, उत्सवांनिमित्त आनंदाच्या पर्वणीचे पीक बहरुन असते. इतर सण उत्सवांप्रमाणे अक्षय तृतीया सणानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आठवणींना उजाळा दिला जात असून स्मरणातील आखाजी शब्दांतून व्यक्त केली जात आहे. आखाजीची लोकगीते प्रसारीत केले जात आहेत. एखाद्या घरातली आजीबाई आखाजी गीते सुस्वरे गात असतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आखाजी निमित्ताने घरात सुरू असलेल्या सरसामानाच्या तयारीचे फोटोही शेअर करत औपचारिकता का असेना पण एकमेकांना सहभागी करून घेण्याचा अटृटाहास चालवला जात आहे.

लेखन--दिगंबर महाले, अमळनेर, जि. जळगाव

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाAmalnerअमळनेर