शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अजित पवार यांच्या नाकावर टिच्चून जामनेरसाठी ३०० कोटींचा निधी आणला : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:46 IST

आघाडी सरकारच्या कार्यकाळात जामनेर नगरपालिकेसाठी ३० लाखांच्या निधीची मागणी अजित पवार यांनी फेटाळल्याचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला दावा

ठळक मुद्देकेकतनिंभोरे येथे ३६ कोटींच्या निधीतून विजेचे सबस्टेशन मंजूरमार्च २०१८ पर्यंत शहरविकासाच्या सर्व योजनांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्नछत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा संकल्प

आॅनलाईन लोकमतजामनेर, दि.१६ : राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना जामनेर नगरपालिकेसाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ३० लाखांच्या निधीची मागणी केली होती. मात्र त्यांनी ती नाकारली होती. आता त्यांच्या नाकावर टिच्चून विकास कामांसाठी ३०० कोटींचा निधी मिळविल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी सकाळी केले.सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत नगरपालिकेने २८ कोटींची वाघूर धरणातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणारी वाढीव पाणी पुरवठा योजना केली. या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण व भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया योजनेचा भुमीपूजन कार्यक्रम शिवाजी नगर कॉर्नरवर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या.गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मार्च २०१८ पर्यंत शहरविकासाच्या सर्व योजनांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. शहरातील सर्वच खुल्या भूखंडांमध्ये मंगल कार्यालयाची बांधणी करायची आहे. व्यापारी संकुलांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडीत दिनदयाल उपाध्याय व महात्मा फुले यांची नावे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.यासोबत शहरातील गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध बसावा यासाठी शहरातील सर्वच भागात एक महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. संपूर्ण शहर वाय-फाय करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच अद्ययावत व सुसज्य ग्रंथालय व इ-लर्निंग सेंटर, स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोनबर्डीच्या चारही बाजूने ट्रक तसेच जलतरण तलाव, मल्टीपर्पज हॉल व भव्य शिवमंदिराचे काम पूर्णत्वाकडे असल्याचे त्यांनी सांगितले.केकतनिंभोरे येथे ३६ कोटींच्या निधीतून विजेचे सबस्टेशन मंजूर झाले आहे. त्या कामास पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. शहरातील कन्या शाळेच्या अडीच एकर मोकळ्या जागेत ३०० गाळ्यांचे प्रशस्त व्यापारी संकुल व पालिकेची प्रशासकिय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ लवकर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमास जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि.प.सभापती रजनी चव्हाण, विद्या खोडपे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, कल्पना पाटील, सविता पाटील, छगन झाल्टे, श्रीराम महाजन, अ‍ॅड.सितेष साठे, अ‍ॅड.शिवाजी सोनार, जितू पाटील, चंद्रकांत बाविस्कर, नवल पाटील, अमर पाटील, अण्णा पिठोडे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्यासह नागरिक उपस्थित होेते.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJamnerजामनेरJalgaonजळगाव