शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार आहेतच मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 13:14 IST

गतकाळात मात्र तोडफोड करुन लायकी नसलेलेही मुख्यमंत्री झालेत, अशी पुष्टी जोडत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला.

- कुंदन पाटील 

जळगाव : मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा कुणाच्या मनात नसते.  अजित पवार मात्र सर्वार्थाने अनुभवी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच, अशी शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येथे भूमिका मांडली. गतकाळात मात्र तोडफोड करुन लायकी नसलेलेही मुख्यमंत्री झालेत, अशी पुष्टी जोडत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला.

रविवारी उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत, त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत शुक्रवारी रात्री जळगावात आले.शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.संपर्क प्रमुख संजय सावंत यावेळी उपस्थित होते. तेव्हा ते श्रीखंड-पुरी खाण्यात मग्न खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या गौरव सोहळ्यात ‘श्री’भक्त उन्हामुळे तडफडत होते आणि मुख्यमंत्र्यांसह जबाबदार मंडळी ‘एसी’त बसून श्रीखंड-पुरी खात होते. 

तिथला मृतांचा आकडा भयानक आहे. तो आकडा दडवला जात आहे.पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीस राज्य सरकारविरोधात आग ओकत होते. सरकारने मात्र मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत हल्लाखोर ग्रामस्थांवर गोळीबार केला. मग खारघरच्या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडे स्क्रिप्ट वाचण्याचे काममुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे असतात, याची कुणालाही कल्पना नसते. राज्याच्या विकासाचा प्रश्न सोडून ते राजकीय वचप्यासाठीच सभा आणि कार्यक्रम घेत फिरतात. भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचण्याचीच जबाबदारी त्यांच्यावर आहे, असा टोला त्यांनी लगावला.

‘गुलाबो गॅंग’पाहिला का?ठाकरेंच्या सभेत घुसण्याचा इशारा देणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर राऊतांनी जहरी टीका केली. पळकुटे म्हणतात, ठाकरेंच्या सभेत घुसेन म्हणून. मी आता जळगावात घुसलोय. मला त्यांचा एक उंदीर दिसला नाही. आम्ही निधड्या छातीचे आहोत. नेते म्हणविणारे हे नुसते भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट आहेत. नुसती दाढी-मिशी असून चालत नाही.चांगल्या मिशा तर कुख्यात आतिक अहमदलाही होत्या. तुम्ही ‘गुलाबो गॅंग’ पाहिला का, असा सवाल करुन त्यांनी मंत्री पाटील यांना चिमटा घेतला.

'मी होतो रुग्णालयात'पाचोऱ्याचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते. जेव्हा आर.ओ.पाटील कोम्यात गेले, तेव्हा मी स्वत: रुग्णालयात हजर होतो. ‘मातोश्री’वरुन सातत्याने डॉक्टरांशी संपर्क सुरु होता. ठाकरेंच्या सभेची धास्ती घेतल्याने आमदार किशोर पाटील यांनी ही दिशाभूल केल्याचा दावा राऊत यांनी केला. आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना फारसे गांभिर्याने घ्यायचे नसते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे