विमानतळ ते जैन हिल्स प्रवास हेलिकाप्टरने, जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:34 IST2020-02-15T13:33:33+5:302020-02-15T13:34:19+5:30
विमानतळावर स्वागत

विमानतळ ते जैन हिल्स प्रवास हेलिकाप्टरने, जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दाखल
जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी जळगावात विविध कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री यांचे शनिवारी दुपारी १ वाजता खास विमानाने जळगाव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदिंनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर मुख्यमंत्री जैन इरिगेशन येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी हेलिकाप्टरने रवाना झाले.