अहमदाबाद- दरभंगा एक्स्प्रेस अचानक रद्द, प्रवाशांचे हाल

By Admin | Updated: May 6, 2017 12:54 IST2017-05-06T12:54:36+5:302017-05-06T12:54:36+5:30

रेल्वेगाडी रद्द होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

Ahmedabad-Darbhanga Express canceled | अहमदाबाद- दरभंगा एक्स्प्रेस अचानक रद्द, प्रवाशांचे हाल

अहमदाबाद- दरभंगा एक्स्प्रेस अचानक रद्द, प्रवाशांचे हाल

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 6 - पश्चिम  रेल्वेची 15560 डाऊन अहमदाबाद-दरभंगा जनसाधारण एक्स्प्रेस  शनिवार, 6 मे रोजी अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. रेल्वेगाडी रद्द होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवडय़ातही भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द केल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. दरभंगा एक्सप्रेस 222ही गाडी अहमदाबाद येथून सुटते व भुसावळ येथे सकाळी पाच वाजता पोहचते. दरम्यान, ही गाडी कशामुळे रद्द करण्यात आली याबाबत भुसावळ येथील प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नव्हती. गाडीची वेळ झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून ही गाडी रद्द केल्याची सूचना सकाळी उद्घोषणा कक्षातून देण्यात आली. पश्चिम रेल्वेने या गाडीचा पूर्ण रेक अन्यत्र पाठविल्याने ही गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Ahmedabad-Darbhanga Express canceled