सायगाव येथे कृषी दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:21+5:302021-07-02T04:12:21+5:30
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भूषण पाटील यांच्या प्रयत्नाने गरजू व गरीब शेतकऱ्यांना रोटरीमार्फत ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडला. ...

सायगाव येथे कृषी दिन उत्साहात साजरा
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भूषण पाटील यांच्या प्रयत्नाने गरजू व गरीब शेतकऱ्यांना रोटरीमार्फत ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकरी मेळावादेखील घेण्यात आला. कृषी दिनानिमित माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व बळिराजा प्रतिमेचे पूजन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य भूषण पाटील, रोटरीचे अध्यक्ष रोशन ताथेड, सरपंच कमळाबाई माळी, आर. के. माळी, कांतीभाई पटेल, धर्मा काळे, सरपंच प्रकाश यशोद, राजेंद्र कटारीया, सुधीर झुंबर, बच्छे पाटील, संजय चौधरी, सुरेश सोनवणे, मारोती काळे, दिनेश महाजन, ग्रामविकास अधिकारी बी. एन. देवरे, आबा बच्छे, भैया पाटील, रमेश माळी, बाळासाहेब सोनवणे, प्रकाश मेखा, संजय महाले, अश्फाक काझी, बापू माळी उपस्थित होते. सचिव भैया पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आर. के. माळी यांनी आभार मानले.