शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माळण नदी बहरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 7:35 PM

अमळनेर परिसर : गावकऱ्यांनी केले जलपूजन, पाणी अडल्याने विहिरीही पाझरल्या

ठळक मुद्देमाळन नदीचे मोठ्या प्रमाणावर सुमारे पाच ते सहा कि.मी. लांब अंतरापर्यंत खोलीकरण झाल्याने पहिल्याच पावसात पात्रात पाच ते सहा कि.मी. लांबीचा जलसाठा साचला आहे.काठावरील परिसरातील गावातील लगतच्या कोरड्या विहिरींना अल्प कालावधीत पाणीस्रोत झरे दिसून आले आहेत.शेतकरी सुखावले आहेत. तसेच परिसरातील सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तूर्त सुटल्यात जमा आहे.

मारवड, ता.अमळनेर (जि.जळगाव) : मारवड व परिसरात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर नदीनाले खोलीकरण व रुंदीकरण होऊन तीन वर्षे उलटूनही सततचा दुष्काळ व अत्यल्प पावसामुळे एक थेंबभरही पाणी न अडल्याने निराश झालेल्या नागरिकांना या वर्षीच्या मान्सूनपूर्व जोरदार पावसाच्या आगमनाने अक्षरश: आनंदाने नाचण्यास भाग पाडले आहे.येथील मारवड परिसर विकास मंचच्या माध्यमातून आयकर आयुक्त संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ एकत्र आले. तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर माळण नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच शिवारातील नाले खोदाई व जागोजागी पाणी अडविण्यासाठी बंधारे केले होते. मात्र निसर्गाची साथ न लाभल्याने नदीपात्र पाण्याविना कोरडेठाक पडल्याने शेतकºयांसह विकास मंचाचे कार्यकर्ते हतबल झाले होते. मात्र गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या,नाले तुडुंब भरल्याने गावकºयांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केलेल्या मेहनतीला फळ आल्याचे पाहून गावकºयांनी तुडुंब भरलेले बंधारे व नदीपात्र पाहून गावात डीजे लावून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी डीजेच्या तालावर वाजतगाजत माळण मातेच्या साडी, चोळी आहेराची विठ्ठल मंदिरापासून गावभर मिरवणूक काढून नदीमातेची ओटी भरून विधीवत जलपूजन केले. मिरवणुकीवेळी मारवड विकास मंचचे प्रमुख मार्गदर्शक आयकर आयुक्त संदीप साळुंखे, डीवायएसपी गिरीश पाटील, इंजिनिअर विजय भदाणे यांनी चौकाचौकात थांबून नागरिकांना श्रमदानाचे व पाणी अडविण्याचे महत्व पटवून दिले तर श्रमदान केलेल्या तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. याकामी बाहेरगावी नोकरी करीत असलेल्या गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा केली होती. जलपूजन उत्सवास हे सर्व आवर्जून उपस्थित होते. याशिवाय मारवडचे सरपंच उमेश साळुंखे, माजी सरपंच ताराबाई साळुंखे, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, गोवर्धनचे माजी सरपंच देवीदास पाटील तसेच मारवड, गोवर्धन, बोरगाव, धानोरा, भोरटेक, जैतपीर आदी नदीकाठावरील लाभार्थी गावाचे नागरिक महिला व तरुणवर्ग शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :WaterपाणीAmalnerअमळनेर