मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:20 IST2020-01-01T12:19:33+5:302020-01-01T12:20:12+5:30

मंत्री आज जळगावात

After taking oath as Minister, Gulabrao Patil met Sureshdada Jain | मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

जळगाव : शिवसेनेचे नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी मुंबईत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेवून आशिर्वाद घेतले. दरम्यान, बुधवारी गुलाबराव पाटील हे जळगावला येत आहेत. सकाळी ११ वाजता त्यांचे शिवसेनेकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
भेटी दरम्यान, सुरेशदादा यांनी मंत्रीपद मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटील यांचे अभिनंदन केले. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यांच्यासोबत बाजार समिती सभापती कैलास चौधरी, नगरसेवक गणेश सोनवणे, मनोज चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची त्यांचा मातोश्री या निवासस्थानावर जावून भेट घेत आशिर्वाद घेतले. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यांतर ते बुधवारी प्रथमच शहरात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सर्व तालुकाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांना बुधवारी सकाळी ११ वाजता रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या आहेत.
रेल्वे स्टेशनपासून रॅली
पाटील यांच्या स्वागतासोबतच शिवतिर्थ मैदानापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत मंगळवारी होणारी शिवसेनेची बैठक रद्द करण्यात आली. ती बैठक बुधवारी पद्मालय या शासकीय विश्रामगृहावर घेण्यात येणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत.

Web Title: After taking oath as Minister, Gulabrao Patil met Sureshdada Jain

टॅग्स :Jalgaonजळगाव