मोबाईल रेकॉर्ड नंतर ‘दूध का दूध पानी का पानी’
By Admin | Updated: October 25, 2015 00:46 IST2015-10-25T00:46:35+5:302015-10-25T00:46:35+5:30
सागर चौधरी ज्या दिवशी पोलीस स्टेशनला सादरे यांच्याविरुध्द तक्रार नोंदवायला गेला, त्या दिवशीचे मोबाईल कॉल रेकॉर्ड काढले तर दूध का दूध व पानी का पानी होईल, असा सुर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मोबाईल रेकॉर्ड नंतर ‘दूध का दूध पानी का पानी’
जळगाव : वाळू व्यावसायिक सागर चौधरी याच्याशी भाजपाचा कोणताही संबंध नाही असा दावा भाजपाकडून होत असताना सत्यता पडताळण्यासाठी सागर चौधरी ज्या दिवशी (3 मे 2015) रामानंद नगर पोलीस स्टेशनला अशोक सादरे यांच्याविरुध्द तक्रार नोंदवायला गेला, त्या दिवशीचे मोबाईल कॉल रेकॉर्ड (सीडीआर) काढले तर दूध का दूध व पानी का पानी होईल, असा सुर शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ‘लोकमत’कडे व्यक्त केले. 3 मे रोजी सागर चौधरीचे वाळूचे डंपर रामानंद नगर पोलिसांनी पकडले होते. ते सोडून द्यावेत यासाठी रवींद्र चौधरी व सागर चौधरी हे सादरेंच्या घरी गेले होते. तेव्हा सादरेंनी आपल्याला रिव्हॉल्वर लावून धमकावल्याचा आरोप सागर चौधरी यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सादरे यांच्यावर खंडणी, जीवे ठार मारणे व शस्त्राचा धाक दाखविणे आदी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नैराश्यातून पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी आत्महत्या केली होती. गुन्हा दाखल करण्यासाठी पाडवींवर दबाव घटनेच्या दिवशी बडय़ा नेत्याने मोबाईलवर फोन करून पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना सादरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, डॉ.सुपेकर यांनी उपअधीक्षक किशोर पाडवी यांना घटनास्थळी पाठविले होते. सागरच्या सांगण्यावरुन पाडवी यांनी गुन्हा दाखल केला नव्हता. सादरेंवर गुन्हा दाखल साठी पाडवी यांच्यावर दबाव आणला होत एका वाळू माफियाच्या तक्रारीला किती महत्त्व द्यायचे, शिवाय त्याने यापूर्वी अनेक अधिकारी व कर्मचा:यांच्या विरोधात खोटय़ा तक्रारी केल्याचा पूर्वइतिहास असल्याने पाडवी यांनी तक्रार अर्ज घेऊन चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. हा गुन्हा दाखल होत नसल्याने त्या दिवशी दोन आमदार व एक नगरसेवक सागरच्या संपर्कात होते, अशीही माहिती पुढे येत आह़े सागर व रायते यांच्यासह दोन आमदार व नगरसेवक यांचे कॉल रेकॉर्ड तपासले तर यात कोण दोषी आहे व कोण नाही याचा उलगडा होईल, असे मत अनेकांनी