अकरा दिवसानंतर पाटणा ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 08:37 PM2019-06-20T20:37:24+5:302019-06-20T20:37:29+5:30

मंदिर वाद : दानपेटीचा हक्क ग्रामस्थ व पुजारी या दोघाचाही हक्क

After eleven days, the hunger strike of Patna villagers concludes | अकरा दिवसानंतर पाटणा ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता

अकरा दिवसानंतर पाटणा ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता

Next


चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी मंदिराचा वाद विकोपाला गेला असून पुजारी बाळकृष्ण जोशी यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच होते. अखेर तहसीलदार अमोल मोरे व पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मध्यस्थीने १९ रोजी उपोषणाची सांगता झाली. याप्रकरणी चोकशी होईपर्यंत पाटणादेवी मंदिरावरील दानपेटीचा हक्क पुजारी व ग्रामस्थ यांचा असणार आहे.
दरम्यान, उपोषणाचा दहावा दिवस असून प्रशासनाने कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा उपोषण ग्रामस्थ दीपक शिवाजीराव पाटील आणि आनंदराव भीमराव शेळके यांनी धमकी दिल्यामुळे प्रशासन जागे झाले आणि अधिकारी उपोषण स्थळी दाखल झाले.
पाटणादेवी मंदिराची देखभाल दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाकडे आहे मात्र या ठिकाणी कौटुंबिक सदस्यांना एकत्र करून पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी प्रतिष्ठान स्थापन केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आलेल्या भाविकांच्या देणग्या स्वीकारल्या जातात त्याचा विनियोग मंदिराच्या विकासासाठी दिसत नाही.तसेच ही संस्था करण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही , असा आरोप ग्रामस्थांनी शासन दरबारी केला होता.
व्यक्तिगत स्वाथार्साठी बाळकृष्ण जोशी यांनी बेकायदेशीररित्या प्रतिष्ठान स्थापन करून मंदिराला दान म्हणून मिळणारी मिळकत स्वत:च्या घशात घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली होती आणि यामागणी साठीच गेल्या दहा दिवसापासून पाटणा ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली होती.
उपोषणाच्या अकराव्या दिवशीघटनास्थळी प्रांत शरद पवार, तहसीलदार मोरे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही ग्रामस्थांना त्यांनी दिली. दरम्यान, पुजारी बाळकृष्ण जोशी यांच्याकडे असलेले ताम्रपत्र त्याचबरोबर प्रतिष्ठानची कागदपत्रे पडताळून पाहण्यासाठी पुरातत्व विभाग व धर्मदाय अधिकाº्यांना सूचना केल्या आहेत. त्यांच्या चौकशीनंतरच यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.

Web Title: After eleven days, the hunger strike of Patna villagers concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.