क्लीनचिटनंतर एकनाथराव खडसे यांचे उद्या प्रथमच जळगाव जिल्ह्यात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:50 IST2018-05-10T13:50:41+5:302018-05-10T13:50:41+5:30
शस्त्रक्रियेमुळे होते मुंबईत

क्लीनचिटनंतर एकनाथराव खडसे यांचे उद्या प्रथमच जळगाव जिल्ह्यात आगमन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिल्यानंतर ११ मे रोजी त्यांचे प्रथम जळगाव जिल्ह्यात आगमण होणार आहे.
क्लीन चिटनंतर खडसे यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते मुंबईतच होते. आता उपचारामुळे सुधारणा असल्याने व मुक्ताईनगर येथे मुक्ताई अतर्धान सोहळा असल्याने आपण ११ रोजी भुसावळ येथे येऊन मुक्ताईनगरला जाणार असल्याचे खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, क्लीनचिटनंतर त्यांचे प्रथमच जिल्ह्यात आगमण होत असल्याने खडसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागताचीही जय्यत तयारी केली जात आहे.