Adult suicide by burning in a lake | जळगावात गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या
जळगावात गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

जळगाव- ‘मेरे कर्म और स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया देंगे, अशा आशयाची हिंदी भाषेत चिठ्ठी लिहून प्रमोद लालचंद दायमा (५०, रा. भिलपुरा चौकीजवळ, शनीपेठ ) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता उघडकीस आली.
शहरातील भिलपुरा चौकीजवळ प्रमोद दायमा हे पत्नी राजश्री सोबत वास्तव्यास होते. मुलगा कृष्णा हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुण्याला नोकरी करतो. मुलगी राजश्री ही विवाहित आहे. प्रमोद दायमा हे त्यांचे नातेवाईक डॉ. ओमप्रकाश त्रिपाठी यांच्या आयुर्वेदीक दवाखान्यात औषधी बनवायचे काम करीयचे. तर पत्नी राजश्री मेहंदी आर्टिस्ट आहे. आॅर्डर मिळेल त्यानुसार त्या मेहंदी काढून देण्याचे काम करतात.
मोलकरणीमुळे प्रकार उघड
राजश्री या गुरुवारी दुपारी १ वाजता आॅर्डरनुसार मेहंदी काढावयास गेल्या होत्या. प्रमोद हे घरी एकटेच होते. यादरम्यान त्यांनी छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी साडे जार वाजता घर कामावर असलेली मोलकरीण आली असता तिला प्रमोद दायमा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. त्यांनी तत्काळ असलेल्या डॉ. त्रिपाठी यांच्या रुग्णालयाकडे धाव घेतली. डॉ. ओमप्रकाश त्रिपाठी यांच्यासह दायमा यांचे शालक मनपाचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. राजश्री दायमा यांचा मन हेलावणारा आक्रोश होता. माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
अशी आहे मृत्युपूर्व चिठ्ठी
प्रमोद दायमा यांनी मृत्युपूर्वी लिहलेली हिंदी भाषेतील चिठ्ठी आढळून आली आहे. यात त्यांनी ‘मेरे कर्म और मेरे स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया बढायेंगे, इसलिये मै फाशी ले रहा हू, मेरी सुसाईड को किसीको भी जिम्मेदार ना ठहराना असे म्हटले आहे. शनिपेठ पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Adult suicide by burning in a lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.