....तर आमदारांच्या एक कोटींच्या निधीवर येणार संक्रांत; मतदारसंघात ५० टक्के खर्च केल्यावरच वाढीव निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2023 17:17 IST2023-03-21T17:15:37+5:302023-03-21T17:17:11+5:30
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षापासून अनुज्ञेय ५ कोटींच्या निधीत एक कोटी वाढीव निधी असतो.

....तर आमदारांच्या एक कोटींच्या निधीवर येणार संक्रांत; मतदारसंघात ५० टक्के खर्च केल्यावरच वाढीव निधी मिळणार
- कुंदन पाटील
जळगाव : मतदारसंघासाठी दिलेला निधी ५० टक्के खर्च व ८० टक्के विकास कामांना प्रशासकीय मान्यता असल्यावरच यापुढे आमदारांना वाढीव १ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात त्यादृष्टीने प्रत्येक आमदारांला काळजी घ्यावी लागणार आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षापासून अनुज्ञेय ५ कोटींच्या निधीत एक कोटी वाढीव निधी असतो. प्राप्त निधीपैकी ज्या मतदारसंघाचा खर्च ५० टक्के व प्रशासकीय मान्यता झालेली विकास कामे ८० टक्के असल्यावरच वाढीव निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यादृष्टीने वित्त विभागाने राज्यभरातील जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार या अटी पूर्ण न करणाऱ्या मतदारसंघांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि
१ कोटींचा वाढीव अनुज्ञेय निधी वितरीत करण्या संदर्भात सूचित करण्यात आले आहे.
आमदारांनी केलेल्या खर्चाची व प्रशासकीय मान्यतेची टक्केवारी
आमदार खर्चाची टक्केवारी प्रशासकीय मान्यतेची टक्केवारी
लता सोनवणे ९७.८८ ९९.१८
गिरीश महाजन ६४.२० १३५.१६
सुरेश भोळे ९५.८७ १३१.५२
गुलाबराव पाटील ८५.२४ १०७.५५
चिमणराव पाटील ७९.०८ १२५.२०
अनील पाटील ९९.३७ १४९.९७
किशोर पाटील ९९.४७ १२८.४६
मंगेश चव्हाण ७९.३७ ९३.८३
संजय सावकारे ९९.८४ १४६.६१
चंद्रकांत पाटील ९९.५३ १३२.०७
शिरीष चौधरी ३०.२५ १०४.१५
एकनाथ खडसे ३०.२५ १०४.१६
चंदूलाल पटेल १०० ९९.९७