जळगावच्या तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर नेणाºयाला साडेपाच वर्षे कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:41 IST2018-10-30T16:39:26+5:302018-10-30T16:41:31+5:30
वाळूचोरी करताना अडविलेले डंपर अपर जिल्हाधिकाºयांच्या अंगावर नेण्याच्या प्रकरणात डंपरचालक तुळशीराम अशोक कोळी (वय ३२, रा.अट्रावल, ता.यावल ह.मु.साकेगाव, ता.भुसावळ) याला न्यायालयाने सोमवारी वेगवेगळ्या कलमाखाली साडेपाच वर्ष कैदेची शिक्षा व ९ हजारांचा दंड केला.

जळगावच्या तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर नेणाºयाला साडेपाच वर्षे कैद
जळगाव : वाळूचोरी करताना अडविलेले डंपर अपर जिल्हाधिकाºयांच्या अंगावर नेण्याच्या प्रकरणात डंपरचालक तुळशीराम अशोक कोळी (वय ३२, रा.अट्रावल, ता.यावल ह.मु.साकेगाव, ता.भुसावळ) याला न्यायालयाने सोमवारी वेगवेगळ्या कलमाखाली साडेपाच वर्ष कैदेची शिक्षा व ९ हजारांचा दंड केला.
तत्कालिन अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, तलाठी पुंडलिक मोहन सोनार व अन्य महसूलच्या अधिकाºयांचे पथक १४ जुलै २०१५ रोजी गस्तीवर असताना खेडी येथील नदीपात्रात वाळूचोरी करणारे डंपर अडविले होते.
यावेळी चालकाने जागेवरच वाळू टाकून डंपर पथकाच्या अंगावर नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तलाठी पुंडलिक सोनार यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस स्टेशनला कलम ३०७, ३५३ व ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारतर्फे अॅड.वैशाली महाजन यांनी काम पाहिले. शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी तपासाधिकारी, पैरवी अधिकारी राजेंद्र सैंदाणे व पंचांना वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.