अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 16:52 IST2017-12-22T16:43:48+5:302017-12-22T16:52:45+5:30
अमळनेरात वाल्मिकी मेहतर समाजाने लेखी निवेदनाद्वारे केली मागणी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा
आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि.२२ : अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांनी एका टीव्ही चॅनलवर मेहतर समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी या दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे लेखी निवेदन अमळनेर येथील वाल्मिकी मेहतर समाजाने प्रांताधिकारी संजय गायकवाड व पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना शुक्रवारी दिले.
एका टी.व्ही.चॅनल वर अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांनी मेहतर समाजाबद्दल कथित वक्तव्य केले होते. याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होत आहे. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अमळनेर तहसील कार्यालय सुमारे ३०० पेक्षा जास्त वाल्मिकी मेहतर समाजाच्या तरुणांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी वाल्मिकी मेहतर समाजाच्यातर्फे अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांचे पोस्टर जाळण्यात आले. यावेळी नगरसेवक संतोष लोहेरे, अनिल बेंडवाल, राम कलोसे, राजू जाधव, राजू चंडोले, रवी घोगले, बलराम हटवाल, दीपक चावरीया, किसन कलोसे, शेखर पवार, पप्पू लोहेरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.