मास्क न वापरणाऱ्या ६५९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST2021-02-23T04:24:11+5:302021-02-23T04:24:11+5:30
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशाचे ...

मास्क न वापरणाऱ्या ६५९ जणांवर कारवाई
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशाचे दिलेले असतानाही नागरिकांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत. रविवारी सकाळी ८ ते रात्री ७ या कालावधीत जिल्ह्यात ६५९ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अशी आहे विभागनिहाय कारवाई
विभाग संख्या दंड
जळगाव ४५ १६,२००
भुसावळ ७१ १४,२००
फैजपूर २९ ९,५००
मुक्ताईनगर १५४ २९,६००
चोपडा ७९ १५,८००
अमळनेर ९५ ६१,०००
पाचोरा ८२ २०,३००
चाळीसगाव १०४ २०,८००
एकूण ६५९ १,८७,४००