पोलिस बंदोबस्तात वीज चोरांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:36 PM2019-11-19T21:36:59+5:302019-11-19T21:37:16+5:30

तणाव : महावितरणची आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई, १२५ हून अधिक आकोडे काढले

 Action against thieves in police settlement | पोलिस बंदोबस्तात वीज चोरांवर धडक कारवाई

पोलिस बंदोबस्तात वीज चोरांवर धडक कारवाई

Next

जळगाव : थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडीत केल्यानंतरही ग्राहकांनी थेट ट्रान्सफार्मरमधूनच अवैध कनेशक्शन घेऊन वीज चोरी सुरु केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी अचानक वाल्मिक नगरात पोलीस बंदोबस्तात कारवाईची मोहीम राबविली. यावेळी १२५ पेक्षा गास्त आकोडे काढण्यात आले. या कारवाईमुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
या परिसरात मोठ्या संख्येने थकबाकीदार असल्यामुळे, महावितरणने बहुतांश ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. तरीही काही ग्राहकांकडून आकोडे टाकुन वीजेचा वापर सुरु होता. यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी येथील दोनपैंकी एक ट्रान्सफार्मर कायम स्वरुपी बंद केला आहे. बोटावर मोजण्या इतकेच ग्राहक नियमित वीज बिल भरत असल्यामुळे या ग्राहकांची एकाच ट्रान्सफार्मर वीजेची जोडणी केली होती. तर आकोड्यांना प्रतिबंध घालण्यासाठी विद्युत तारांमधीलही वीज पुरवठा बंद केला आहे.
त्यामुळे वीजेची चोरी करणाºया ग्राहकांनी अधिकृत ग्राहकांना दिलेल्या ट्रान्सफार्मरच्या वीज जोडणीच्या ठिकाणाहूनच बेकायदेशिरपणे चोरीचा वीज पुरवठा घेतला होता. त्यामुळे महावितरणला मोठा आर्थिक भुर्दड बसत होता.
कारवाईमुळे दिवसभर तणावाचे वातावरण... पोलीस बंदोबस्तात सकाळी साडे दहाला कारवाईला सुरुवात करण्यात आल्यानंतर दुपारी बारापर्यंत चोरीचे आकोडे काढण्यात आले होते. यानंतर महावितरणच्या अधिकाºयांनी या ठिकाणी एरियल बंचची केबल टाकली. या नंतर अधिकृत ग्राहकांचा नव्याने वीज पुरवठा जोडण्यात आला. सायंकाळपर्यंत हे कामकाज सुरु होते. तो ार्यंत महावितरणचे अधिकारी व पोलिसांचा ताफा घटनास्थळीच थांबून होता. यामुळे दिवसभर या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.
चोरी रोखण्यासाठी टाकली एरियल बंच केबल
४यावेळी महावितरणच्या कर्मचाºयांनी या ठिकाणी पुन्हा वीज चोरीचा प्रकार घडू नये, यासाठी १५० फुटापर्यंत एरियल बंचची केबल टाकली. या केबलमुळे येथील ग्राहकांना वीजेची चोरी करता येणे अशक्य आहे. तसेच या केबलमुळे अधिकृत ग्राहकानांच महावितरणकडून वीजेची जोडणी करुन देण्यात येणार आहे.

Web Title:  Action against thieves in police settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.