जळगावात ६० वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:35 IST2019-12-31T21:35:15+5:302019-12-31T21:35:59+5:30
जळगाव : शहर वाहतूक शाखेच्या पथकाने मंगळवारी दाणाबाजार परिसरात एकेरी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६० वाहनांवर कारवाई केली. या ...

जळगावात ६० वाहनांवर कारवाई
जळगाव : शहर वाहतूक शाखेच्या पथकाने मंगळवारी दाणाबाजार परिसरात एकेरी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६० वाहनांवर कारवाई केली. या वाहनधारकांकडून ११ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. येथील नियमितच्या वाहतूक कोंडीबाबत येथील व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी शहर वाहतूक शाखेकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले, नरेंद्र पाटील, संजय पाटील, संजय मराठे, स्वप्नाली सोनवणे, सचिन पारधी, परमेश्वर जाधव, मनिषा विसपुते, सुभाष चव्हाण यांच्या पथकाने धडक कारवाईची मोहीम राबविली.