जळगावात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:33 IST2018-10-25T16:29:55+5:302018-10-25T16:33:55+5:30

अपहरण, पळवून नेणे व बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेला मुकुंदा विलास सपकाळे ( २२, रा.वड्री, ता.यावल) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी घडली.

The accused by the police in Jalgaon hit the spot | जळगावात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार

जळगावात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार

ठळक मुद्देमुकुंदा सपकाळेवर अपहरण व पळवून नेल्याचा गुन्हातपासणीसाठी आणले होते जिल्हा रुग्णालयात








यावल : अपहरण, पळवून नेणे व बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेला मुकुंदा विलास सपकाळे ( २२, रा.वड्री, ता.यावल) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी घडली.
याप्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने गावातीलच अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून २० आॅक्टोबर रोजी पळवून नेले होते. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी २२ रोजी फिर्याद दिली. त्यावरुन यावल पोलिसात सपकाळे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.
त्याला २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या तपासणीसाठी फौजदार दीपक ढोमणे, हवालदार नेताजी वंजारी यांनी जिल्हा रुग्णालयात आणले. चक्कर आल्याच्या बहाण्याने हाताला जोरदार झटका देत आरोपी तिथून पसार झाला.

Web Title: The accused by the police in Jalgaon hit the spot