चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या, ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी होती

By चुडामण.बोरसे | Published: March 9, 2024 09:58 AM2024-03-09T09:58:26+5:302024-03-09T09:58:37+5:30

यात त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

Accused in the crime of theft committed suicide in lockup | चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या, ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी होती

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या, ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी होती

अमळनेर (जि.जळगाव) : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत ( ३५, रा. डांगरी ता. अमळनेर)  याने अमळनेर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली,  डांगरी येथे बकरी चोरी प्रकरणात घनश्याम यास याआधीच अटक झाली होती. यानंतर  त्याला डांगरी -करणखेडे शिवारात तार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली.  

यात त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. ९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान  तो शौचास गेला.  तिथे त्याने  पांघरण्यास दिलेली चादर फाडून गळफास घेतला.
 बराच वेळ आरोपी बाहेर आला नाही, म्हणून गार्डने चौकशी केली,  त्यावेळी आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Accused in the crime of theft committed suicide in lockup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.