भुसावळ, जि.जळगाव : येथील वरणगाव रोडवर दोन संशयित फिरत असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यातील एक संशयित फरार झाला, तर एकास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस सापडले. यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बाजारपेठ पोलिसांनी ५ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास केली.बाजारपेठ पोलीस पथक रात्रीची गस्त घालत असताना, त्यांना वरणगाव रोडवरील सायली हॉटेलसमोर नाकाबंदी करीत असताना दोन संशयित फिरत असताना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. त्यातील रियान उर्फ इप्या (वय २३, रा.आगाखान वाडा) हा संशयित फरार झाला, तर पोलिसांनी असीम शहा हसन शहा (वय २२) या भंगार विक्रेत्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व जिवंत काढतूस मिळाले. ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार, सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे, सहायक फौजदार अंबादास पाथरवट, तस्लीम पठाण, पो.ना. नरेंद्र चौधरी, नंदलाल परदेशी, पो.काँ प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, मंदार महाजन आदींनी केली.दोघा आरोपींविरुद्ध पो.काँ. प्रशांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग सहा, गु.र.नं. २७९/२०१९, आर्म अॅक्ट ३/२५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहे.
भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:18 IST
भुसावळ येथील वरणगाव रोडवर दोन संशयित फिरत असताना पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यातील एक संशयित फरार झाला, तर एकास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस सापडले.
भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक
ठळक मुद्देएक फरार होण्यात यशस्वीभुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई