भुसावळात पुन्हा गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:40 IST2020-07-19T16:39:49+5:302020-07-19T16:40:27+5:30
भुसावळ शहरात गावठी कट्टे सापडण्याचा सपाटा अद्यापही सुरूच आहे.

भुसावळात पुन्हा गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक
भुसावळ : शहरात गावठी कट्टे सापडण्याचा सपाटा अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे शहरात गावठी कट्ट्यांचा कारखाना आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा एका गावठी कट्ट्यासह मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ सोलू (रा.आयान कॉलनी) यास अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एलसीबी पथकाने या आरोपीस अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहाजक फौजदार अशोक महाजन, पो.हे.का. शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पो.ना. किशोर राठोड, पो.काँ.रणजीत जाधव आदींनी आयान कॉलनीत छापा टाकून आरोपीस अटक केली. हा आरोपी यापूर्वीही भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठच्या ताब्यात दिले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध पुन्हा आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.