शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जळगावच्या पोलीस भरतीत गैरप्रकार करणा-या फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:27 IST

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा गैरवापर प्रकरणातील फरार आरोपी रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याच्या गावावरुन अटक केली.

ठळक मुद्दे  कॉडलेस इअर फोनचा गैरवापर औरंगाबाद जिल्ह्यातून घेतले ताब्यात पाच वर्षे सैन्य दलात होता नोकरीला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा गैरवापर प्रकरणातील फरार आरोपी रतन प्रेमसिंग बहुरे (रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याच्या गावावरुन अटक केली.त्याच्याच गावातील मदन महाजन डेडवाल याला कॉडलेस इअर फोनचा वापर करताना १९ एप्रिल रोजी पोलिसांनी कवायत मैदानावरच पकडले होते.  याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून १९ एप्रिल रोजी लेखी परीक्षा होती. पेपर सुरु होण्यापूर्वी मैदानावर प्रत्येक उमेदवारांची अंगझडती घेतल्यानंतर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टरमधून तपासणी करताना मदन पकडला गेला होता. रतन हा बाहेर होता. मदनला पकडल्यानंतर अधिकाºयांचे सर्व बोलणे रतनला ऐकू येत होते. मदनचे बींग फुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तेथून पळ काढला होता. त्यादिवसापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

जाडेवाडीत धडकले पथकरतन हा जाडेवाडीत परतल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, विकास वाघ, विनोद पाटील, गफूर तडवी व दत्तात्रय बडगुजर यांचे पथक तयार केले होते. या पथकाने मंगळवारी दुपारी त्याला घरुनच ताब्यात घेतले. दरम्यान, या संशयिताला ताब्यात घ्यावे म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.सैन्य दलाची नोकरी सोडलीरतन याची पोलिसांनी कुंडली काढली असता तो सैन्य दलात नोकरीला होता. पाच वर्र्षे नोकरी केल्यानंतर सिमा भागावर ड्युटी लागल्याने भीतीपोटी त्याने ही नोकरी सोडली. त्यामुळे तो घरीच होता. सध्या कोणताच कामधंदा करीत नव्हता. त्याने जळगावसह अन्य शहरात देखील पोलीस भरतीत असा प्रकार केला असावा असा संशय पोलीस निरीक्षक कुराडे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा