भुसावळ : येथील खडका रोडवरील मणियार हॉलजवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ दोन गटात भांडण झाले होते. दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला १६ ऑगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल होता. त्यातील ११ महिन्यांपासून फरार आरोपीना ८ रोजी अटक करण्यात आली आहे. (वय २७) व शेख नासीर शेख सरदार (वय ५२) दोन्ही रा. सिद्धेश्वर मंदिर परिसर, खडका रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी अर्फुनिसा शेख अफझल (वय ४९, रा.आझाद नगर, खडका रोड) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या भावाला रॉड व लाथाबुक्क्यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली होती. तेव्हापासून दोघे फरार होते. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी सापळा रचून दोघांना पकडले.
११ महिन्यांपासून फरार आरोपीना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST