मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कोणालाही दुखापत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 20:00 IST2024-08-13T19:59:05+5:302024-08-13T20:00:09+5:30
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कोणालाही दुखापत नाही!
CM Eknath Shinde ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील चार वाहनांना अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव विमानतळावरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आयोजित कार्यक्रमाला जात असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम आज जळगाव जिल्ह्यात आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जात असताना अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. यावेळी पोलिसांच्या एका गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परंतु अपघातात कोणालाही जखम झालेली नाही.
दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. लाडकी बहीण योजनेबाबतच्या या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी योजनेची माहिती उपस्थितांना देत टीका करणाऱ्या विरोधकांच्या महाविकास आघाडीवरही जोरदार पलटवार केला.