पाचोरा - भडगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:30+5:302021-08-24T04:22:30+5:30

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी (दि. २३) पाचोऱ्याहून नाशिककडे जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत आगाराच्या (एमएच १४ बीटी ४७१४) बसमध्ये ...

Accident on National Highway between Pachora and Bhadgaon | पाचोरा - भडगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघात

पाचोरा - भडगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघात

Next

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी (दि. २३) पाचोऱ्याहून नाशिककडे जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत आगाराच्या (एमएच १४ बीटी ४७१४) बसमध्ये ४२ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालक जितेंद्र नामदेव कुंभार (३६, पिंपळगाव हरे, ता. पाचोरा) पाचोऱ्याहून नाशिककडे बस घेऊन जात होते. पाचोरा शहराजवळ अंतुर्ली फाट्यावर अंतुर्लीकडून मोटारसायकलने (एमएच १९ सीडी ५१९३) दोन महिलांना घेऊन मोटारसायकलचालक अचानक महामार्गावर चढून रस्ता ओलांडताना दिसताच बसचालक जितेंद्र कुंभार याने प्रसंगावधान दाखवत ब्रेक लावून गाडी उजव्या बाजूला वळवून थेट रस्त्याच्या खाली धोकेदायक स्थितीत उतरवली. यावेळी मोटारसायकल बसच्या क्लिनर साइडवर आदळली.

यावेळी मोटारसायकलवर असलेल्या दोन महिला व पुरुष बसवर धडकताच खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना तात्काळ जळगाव येथे हलविले तर बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. यावेळी बसमधील प्रवाशांनी बसचालकाचे आभार मानले. या घटनेची अद्याप पोलिसांत नोंद झाली नाही.

Web Title: Accident on National Highway between Pachora and Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.