१५ वर्षांपासून फरार दरोडेखोर अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:42 IST2019-03-16T23:42:47+5:302019-03-16T23:42:59+5:30

चोपडा पोलिसांकडे सुपूर्द

The absconding robbery has been for 15 years | १५ वर्षांपासून फरार दरोडेखोर अखेर जेरबंद

१५ वर्षांपासून फरार दरोडेखोर अखेर जेरबंद

 जळगाव : चोपडा ग्रामीण आणि यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणारा अट्टल दरोडेखोर डब्बू उर्फ डब्बा उंदल्या उर्फ अदिल बारेला (रा़ चिलारिया ता़ सेंधवा, जि़ बडवाणी) याच्या मुसक्या आवळण्यात एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी यश आले़ तब्बल १५ वर्षांपासून हा दरोडेखोर फरार होता़
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकल्यानंतर २००५ पासून डब्बू हा फरार होता़ त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, शुक्रवारी हा फरार संशयित चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली़ त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरूध्द चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्यामुळे त्यास चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़
एलीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बापुसाहेब रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, नारायण पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, किरण चौधरी, मनोज दुसाने, सुशिल पाटील, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने उमर्टी येथे डब्बू यास पकडले़

Web Title: The absconding robbery has been for 15 years

टॅग्स :Jalgaonजळगाव