पारोळा येथून बारावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:52 IST2019-02-06T23:52:08+5:302019-02-06T23:52:42+5:30

शाळेसमोर बसमधून उतरल्याचे गावातील विद्यार्थ्यांनी बघितले

Abduction of Class XII student from Parola | पारोळा येथून बारावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

पारोळा येथून बारावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

पारोळा : टोळी येथील विलास संतोष वाघ या १७ वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याचे पारोळा येथे कॉलेजला आला असता अपहरण झाल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली आहे. हा विद्यार्थी टोळी येथून ५ रोजी सकाळी एनईएस हायस्कूलमध्ये येण्यासाठी निघाला. तो शाळेसमोर बसमधून उतरल्याचे गावातील विद्यार्थ्यांनी बघितले होते. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याचा सर्वत्र तपास केला, मात्र तो सापडला नाही. त्याचे वडील संतोष पाटील यांनी फिर्याद दिली. तपास हे.कॉ.बापूराव पाटील करीत आहेत.

Web Title: Abduction of Class XII student from Parola

टॅग्स :Jalgaonजळगाव