शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून गावाकडे पायी जाताना अपहरण, पोलिसांच्या प्रयत्नानं अल्पवयीन मुलगी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 22:11 IST

वाशिमचा आरोपी पसार : जळगाव पोलिसांच्या स्वाधीन, मुंबईहून निघाले होते कुटुंब

बडनेरा : मुंबईहून कुटुंबासोबत अकोल्याकडे पायी येत असताना जळगावमध्ये अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अमरावती-अकोला महामार्गावरील लोणी टाकळीनजीक सापडली. यात आरोपी पसार झाला असून, अल्पवयीन मुलीला जळगाव पोलीस घेऊन गेले आहेत. पोलीस सूत्रानुसार, मुंबईच्या मुलुंड भागातील एक कुटुंब मिळेल त्या वाहनाने, तर कधी पायी अकोला येथे येण्यास निघाले होते. त्यावेळी, या मुलीचे अपहरण झाले होते. 

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मजुरी करणाऱ्या या कुटुंबातील १७ वर्षाचा मुलगा व १३ वर्षाची मुलगी यांना एका व्यक्तीने दुचाकीवर बसविले. ऊन अधिक असल्यामुळे कुटुंबीयांनीदेखील होकार दिला. काही अंतरावर दुचाकीस्वाराने मुलाला उतरविले. पुढे पोलीस असल्याने तू चालत ये, असे तो म्हणाला. मात्र, बरेच अंतर गाठल्यानंतरही बहीण व लिफ्ट देणारा युवक दिसत नसल्याने ही सर्व घटना मुलाने आई-वडिलांना सांगितली. त्यांनी तात्काळ नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, सदर मुलगी महामार्गावरील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर फिरताना दिसली. या मुलीला लोणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणातील आरोपी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील आहे. गणेश सखाराम बांगर (३२) असे त्याचे नाव आहे. या मुलीला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एन.के. भोई यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिस