आरती महाजन, मनोहर बाविस्कर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:30+5:302021-09-07T04:20:30+5:30
पिलखोड, ता. चाळीसगाव : पिलखोड येथील माहेरवाशीण आरती अतुल महाजन यांची एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व येथील भूमिपुत्र ...

आरती महाजन, मनोहर बाविस्कर यांचा सत्कार
पिलखोड, ता. चाळीसगाव : पिलखोड येथील माहेरवाशीण आरती अतुल महाजन यांची एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व येथील भूमिपुत्र व प्रगती विद्यालयाचे कलाशिक्षक मनोहर शिवाजी बाविस्कर यांची गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
समस्त माळी समाज व ग्रामपंचायत माध्यमिक विद्यालय आर. के. महाजन आयटीआय कृषितंत्र विद्यालय व ग्रामस्थ यांच्यामार्फत हा सत्कार झाला. यावेळी सुपडू माळी, एकनाथ महाजन, छगन बाविस्कर, सरपंच प्रकाश यशोद, उपसरपंच गोकुळ बाविस्कर, दखनकर बाबा, मनीष बाबा, प्राचार्य तुकाराम बोरसे, आर. एस. महाजन, भालचंद्र सोनवणे, नामदेव बाविस्कर, बापूराव बाविस्कर, राजाराम पाटील उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी दफनकर बाबा महानुभाव हे होते. प्रा. वासुदेव बाविस्कर व मिलिंद यशोदा यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आरती महाजन, मनोहर बाविस्कर, अतुल महाजन, पोपटराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.