अबब.. जळगावात विष्णू मनोहर यांनी तयार केली 500 किलो भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:23 IST2017-12-22T14:22:43+5:302017-12-22T14:23:10+5:30

खाद्य महोत्सव

Aab .. 500 kg of vegetables prepared by Vishnu Manohar in Jalgaon | अबब.. जळगावात विष्णू मनोहर यांनी तयार केली 500 किलो भाजी

अबब.. जळगावात विष्णू मनोहर यांनी तयार केली 500 किलो भाजी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22- मराठी प्रतिष्ठान, परेश फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ आयोजित गिरणाई महाराष्ट्र खाद्य व टुरीझम महोत्सवाचा शुक्रवार, 22 रोजी जळगाव येथे सागर पार्कवर शुभारंभ झाला. यामध्ये  पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर व महाराष्ट्र किचन क्वीन प्राजक्ता शाहपूरकर यांच्या अनोख्या चवीने 500 किलो सेंद्रीय भाजी बनविण्यात आली. एकाच वेळी व एकाच भांडय़ात तयार करण्यात आलेल्या या 500 किलो भाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भाजीची ही कला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाली होती. यानंतर अनेकांनी ही भाजी डब्यामध्ये नेऊन तिचा आस्वाद घेतला. 
या महोत्सवात  100 विविध पदार्थ एकाच स्टॉलवर उपलब्ध असून   गृहपयोगी वस्तूदेखील उपलब्ध  आहे. 
22 ते 26 डिसेंबर दरम्यान दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून दुपारी 4  ते रात्री 10 दरम्यान खाद्य महोत्सव असेल.  

Web Title: Aab .. 500 kg of vegetables prepared by Vishnu Manohar in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.