शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

म्हातारी खूप सोनं घालते, लॉकरची चावी कुठेय?; तरुणीला दोरीने बांधले,तोंडात बोळाही खुपसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:46 IST

घरातील दोरीने शुभांगीचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर बेडरुममध्ये जाऊन लाकडी कपाट उघडून शोधाशोध केली.

जळगाव- घरात एकटी असलेल्या २१ वर्षीय तरुणीला दोरीने बांधून दोन जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना कमलानगरच्या भागात सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. 

शुभांगी विश्वास सावंत (२१ रा. चमदगाव ता. धरणगाव, ह.मुं कमलानगर, धरणगाव) असे या तरुणीचे नाव आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनूसार, सोमवारी दुपारी ती घरी एकटीच होती. त्याचवेळी तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात इसम घरात घुसले. एकाने तिच्या डोक्यावर झाडू मारला आणि नाकातोंडाला रुमाल लावून तिच्या तोंडात बोळा खुपसला. 

तसेच घरातील दोरीने शुभांगीचे दोन्ही हात बांधले. त्यानंतर बेडरुममध्ये जाऊन लाकडी कपाट उघडून शोधाशोध केली. पण दोघांना काही आढळून आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी तिला सोनं कुठे ठेवले आहे? म्हातारी तर खूप सोनं घालते, लॉकरची चावी कुठे आहे?, अशी विचारणा केली. त्याचवेळी रस्ताने जाणाऱ्या वाहनाचा आवाज आला, तसेच शुभांगीच्या मोबाईलमध्ये सायरनसारखा आवज झाल्याने दोन्ही जण घरातून पळून गेले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे करीत आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसRobberyचोरी