मक्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक नाल्यात उलटला; चालक बेपत्ता, क्लिनर गंभीर जखमी
By सागर दुबे | Updated: March 22, 2023 22:14 IST2023-03-22T22:14:08+5:302023-03-22T22:14:23+5:30
जळगाव : मध्यप्रदेशाकडून गुजरात राज्याकडे निघालेला मक्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीकच्या कोरडया नाल्यात उलटल्याची घटना बुधवारी ...

मक्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक नाल्यात उलटला; चालक बेपत्ता, क्लिनर गंभीर जखमी
जळगाव :
मध्यप्रदेशाकडून गुजरात राज्याकडे निघालेला मक्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीकच्या कोरडया नाल्यात उलटल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघात ट्रकचे नुकसान झाले असून क्लिनर संजयकुमार पांडे (३५, रा. बिहार) हा गंभीर जखमी झाला असून चालक बेपत्ता आहे. जखमी क्लिनरला सायंकाळी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
एमपी.३९.यूपी.७२९९ क्रमांकाचा ट्रक हा मक्यांनी भरलेल्या गोण्या घेवून मध्यप्रदेश राज्यातून गुजरात राज्याकडे जात होता. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा ट्रक जळगाव तालुक्यातील वावडदा गावानजीक असलेल्या कुरकुरे नाल्याजवळून जात असतांना अचानक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट कोरडया नाल्यात कोसळला. या अपघातात क्लिनर संजयकुमार पांडे हा गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धावून घेवून जखमीला सुरक्षित स्थळी नेले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच जखमी पांडे याला तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. दरम्यान, ट्रक चालक हा घटनास्थळी मिळून आला नाही.