जळगावात तीन मजली इमारत कोसळली; ७० वर्षांची वृद्ध महिला अडकली
By सुनील पाटील | Updated: August 29, 2023 13:29 IST2023-08-29T13:28:10+5:302023-08-29T13:29:44+5:30
राजश्री सुरेश पाठक असे त्या महिलेचे नाव

जळगावात तीन मजली इमारत कोसळली; ७० वर्षांची वृद्ध महिला अडकली
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शिवाजी नगरातील अमर चौकात मंगळवारी सकाळी नऊ वाजता तीन मजली इमारत कोसळली. त्यात राजश्री सुरेश पाठक या ७० वर्षे वृद्धा अडकली असून त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जय शशी महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह महापालिकेचे बांधकाम आरोग्य व आपत्कालीन पथक दाखल झालेले आहे. राजश्री पाठक यांच्या मालकीची ही इमारत असून त्या शेजारीच असलेल्या आर वाय पार्कमध्ये मुलगा व मुलगी यांच्याकडे वास्तव्यास होत्या. नळांना पाणी आल्याने ते आज पाणी भरण्यासाठी येथे आलेल्या होत्या. पाणी भरत असतानाच इमारत कोसळली.