मुख्याध्यापकपदाचा पदभार घेण्यास आलेल्या शिक्षकाला मारहाण
By विलास.बारी | Updated: August 12, 2023 17:04 IST2023-08-12T17:04:14+5:302023-08-12T17:04:35+5:30
शेख साबीर अहमद खलीलोद्दीन हे नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूल येथे उपशिक्षक या पदावर आहेत.

मुख्याध्यापकपदाचा पदभार घेण्यास आलेल्या शिक्षकाला मारहाण
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी.उर्दू हायस्कूल मध्ये मुख्याध्यापकाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या शेख साबीर अहमद खलीलोद्दीन (वय ४८, रा.अक्सानगर, मेहरुण) यांना मारहाण केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
शेख साबीर अहमद खलीलोद्दीन हे नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूल येथे उपशिक्षक या पदावर आहेत. दि.११ रोजी सकाळी ७.५० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे मुख्याध्यापकाचा पदभार घेण्यासाठी आले असताना संशयित वसिम अक्रम शेख मुसा (रा.नशिराबाद) यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांना स्टाफ रुममध्ये नेत याठिकाणी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार अतुल महाजन करीत आहेत.