शहरं
Join us  
Trending Stories
1
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
2
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
3
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
4
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
5
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
6
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
7
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
8
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
9
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
10
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
11
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
12
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
13
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
14
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
15
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
16
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
17
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
18
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
19
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
20
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

पूजेत होम पेटवला, नंतर धूर झाला अन् घडलं विपरीत; पुजाऱ्याच्या मृत्यूने हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:03 IST

जळोद येथे नदी काठावर पुलाखाली जळोद येथील इसमाची उत्तरकार्याची पूजा सुरू होती.

अमळनेर : पूजा सुरु असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अमळनेर येथील एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळोद येथे नदी काठावर बुधवारी दुपारी घडली. अमोल श्यामकांत शुक्ल (३८, रा. अमळनेर) असे या पुजाऱ्याचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे नदी काठावर पुलाखाली जळोद येथील इसमाची उत्तरकार्याची पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाच्या वर असलेले मधमाशांचे पोळ फुटले. पूजेला बसलेल्यांना त्या चावल्याने सर्व जण सैरावैरा पळू लागले. विशेष म्हणजे मधमाशांच्या हल्ल्यावेळी पुजाऱ्यानेच सर्वांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण, यात त्यांचाच मृत्यू झाला. इतर पाच ते सहा जणांनादेखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अमोल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी इतरांना सांगितले की, पळू नका, खाली झोपून घ्या. त्या चावणार नाहीत. आपण पळालो तर त्या आपल्याला चावतील असे म्हणत ते खाली वाकले. सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच चावल्या. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी अमळनेर येथे आणत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :AmalnerअमळनेरJalgaonजळगाव