सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 21:50 IST2023-03-25T21:49:52+5:302023-03-25T21:50:25+5:30

शेतात भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या मितावली येथील सख्ख्या भावांमध्ये वाद झाला.

A close brother became a firm enemy; Younger brother killed elder brother | सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

बिडगाव, जि. जळगाव  :

शेतात भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या मितावली येथील सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. या भांडणात लहान भावाने धारदार विळ्याने मोठ्या भावाचा खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी पारगाव ता.चोपडा शिवारात घडली. संदीप प्रताप पाटील (३६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

मितावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे १० एकर  शेती आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित शेती करतात. दोघंही विवाहित आहेत. शनिवारी सकाळी संदीप पाटील  (३६) व सतीश पाटील (३३) हे  शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला.  त्यावेळी सतीश याने  मोठा भाऊ संदीप याच्यावर धारदार विळ्याने वार करून त्याचा खून केला. गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही. आरोपी शेतातच थांबून होता. अडावदचे एपीआय गणेश बुवा, फौजदार चंद्रकात पाटील, सहायक फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत यांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.  जळगाव येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.   आरोपी सतीश पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: A close brother became a firm enemy; Younger brother killed elder brother