एकनाथ खडसेंना वाढदिवशी ५१ हजारांच्या नोटांचा ‘बुके’, महापौरांकडून ७२ किलो वजनाचा केक भेट
By अमित महाबळ | Updated: September 3, 2023 21:00 IST2023-09-03T21:00:04+5:302023-09-03T21:00:24+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांचा वाढदिवस यंदा दणक्यात साजरा झाला.

एकनाथ खडसेंना वाढदिवशी ५१ हजारांच्या नोटांचा ‘बुके’, महापौरांकडून ७२ किलो वजनाचा केक भेट
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांचा वाढदिवस यंदा दणक्यात साजरा झाला. विशेष म्हणजे, जळगावच्या महापौरांनी खडसेंना शुभेच्छा देण्यासाठी ५१ हजार रुपये मुल्याच्या पाचशेच्या १०२ नोटांचा बुके दिला. यावेळी त्यांनी ७२ किलो वजनाचा आणलेला केकही कापण्यात आला.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा वाढदिवस यावर्षी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिला आणि ते कारण म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खडसेंना दिलेला पाचशेच्या कोऱ्या करकरीत नोटांचा बुके. या बुकेमध्ये एक... दोन... नव्हे तर तब्बल ५१ हजार रुपयांच्या नोटा आहेत. जळगावच्या महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन यांनी हा बुके खडसेंना दिला. यासोबत त्यांनी खडसेंचा ७२ वा वाढदिवस असल्याने ७२ किलो वजनाचा केकही आणला होता. नोटांच्या बुकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समाजसेवेसाठी पैसे दिले
आमदार एकनाथ खडसे हे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वाढदिवशी त्यांना आम्ही बुकेची सप्रेम भेट दिली. समाजातील गरीब घटकाला त्यांच्या माध्यमातून मदत पोहोचल, हा विचार केला आहे. बुकेतील नोटा खऱ्या आहेत.- सुनील महाजन, विराेधी पक्षनेता, जळगाव महापालिका