पाळीव कुत्रा घाबरला म्हणून जळगावात दुचाकीस्वाराला तिघांनी बेदम मारलं 

By विलास.बारी | Updated: April 8, 2023 17:47 IST2023-04-08T17:47:10+5:302023-04-08T17:47:40+5:30

शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सलीम त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी दुचाकीने निघाले होते.

A bike rider was beaten to death by three people in Jalgaon as the pet dog got scared | पाळीव कुत्रा घाबरला म्हणून जळगावात दुचाकीस्वाराला तिघांनी बेदम मारलं 

पाळीव कुत्रा घाबरला म्हणून जळगावात दुचाकीस्वाराला तिघांनी बेदम मारलं 

जळगाव - जवळून दुचाकी गेल्यामुळे पाळीव कुत्रा घाबरून पळाल्याच्या कारणावरून शेख सलिम शेख निजाम (५२, रा. सुप्रिम कॉलनी) यांना कुत्र्यांच्या मालकासह इतर तीन जणांनी मारहाण केल्याची घटना समता नगरातील वंजारी टेकडीजवळ घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात शनिवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सलीम त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी दुचाकीने निघाले होते. वंजारी टेकडी जवळून जात असताना एका पाळीव कुत्र्याच्या बाजूने त्यांची दुचाकी गेल्याने पाळीव कुत्रा घाबरून पळून गेला.हा प्रकार पाळीव कुत्र्याच्या मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेख सलिम यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.तर त्याच्या सोबतच्या इतर तिघांनी सुद्धा चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.याप्रकरणी शेख सलिम यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A bike rider was beaten to death by three people in Jalgaon as the pet dog got scared