लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुंबा येथील गोसेवा अनुसंधान केंद्र येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ९९ महिला शिक्षिकांना रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान स्व. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार लता सोनवणे, स्मिता वाघ, कल्पना चव्हाण, मनीषा गायकवाड, प्रतिभा सुर्वे, ज्योती पाटील, भारती म्हस्के, बुशरा शेख आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमात शिक्षिकापासून ते महापौर या पदापर्यंतच्या प्रवासाची माहिती देऊन शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षिकांनी अग्रेसर होऊन नेतृत्व करावे, असे प्रतिपादन महापौर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फिरोज शेख, प्रतीक्षा पाटील, मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी परिश्रम घेतले, तर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यांचा झाला सन्मान
मनीषा पाटील, राजश्री महाजन, माया अंबटकर, सुवर्णलता अडकमोल, अश्विनी साळुंखे, जयश्री भंगाळे, सोनाली बडगुजर, मनीषा सूर्यवंशी, सुवर्णा देशमुख, नसीम बानो, कल्पना चव्हाण, सुनीता बरडे, निलोफर शेख, अर्चना पाटील, भाग्यश्री तळेले, मनीषा चौधरी, उज्ज्वला पवार, वैशाली शिंदे, विद्या कोल्हे, संगीता देशमुख, उज्ज्वला कुलकर्णी, भावना चौधरी, उषा सोनार, रौशन शेख, अनिता सोनवणे, आशा पाटील, नाज परवीन, योगीता शिंदे, माधवी वाघ, कामिनी पाटील, हर्षदा अलोने, ज्योती पाटील, अनिता पाटील, अनिता मुरलीधर, लतिफा काझी, संगीता पाटील, आशा सोनवणे, रजिया तडवी, शमीम बानो तडवी, अश्विनी कोळी, माधुरी देसले, रामेश्वरी बडगुजर, ज्योती राणे, मनीषा सिरसाठ, संगीता निकम, प्रतिभा पाटील, सुरेखा पाटील, निशा पाटील, अरुणा इंगळे, पूनम चौधरी, वैशाली राणे, भावना वसईकर, रूपाली भुसारी, सरला साबळे, मनीषा कचोरे, कविता चौधरी, ज्योती उंबटकर, ज्योती चौधरी, अंजली महाजन, क्रिती घोगळे, निलोफर नाज, रजनी पाटील, कल्पना बनकर, प्रिया परदेशी, सोनम पाटील, वैशाली वंजारी, प्रतिभा नरवाळे, सविता बोरसे, मनीषा पाटील, मंदाकिनी भामरे, ज्योस्ना महाजन, योगीता महाजन, गजाला तबसुम, क्रिती सोनवणे, वैशाली पाटील, प्राजक्ता जळतकर, संगीता वसईकर, अर्चना पाटील, मोनिका चौधरी, सुजाता पाटील, दीपाली पाटील, अनिता शिंदे, सविता पाटील, नैना कापुरे, पूजा कासार, शुभांगी सोनवणे, वैशाली पाटील, ज्योती पाटील, वैशाली पाटील, सीमा पाटील, स्मिता बाविस्कर, आशा कोळी, मानूबाई पावरा, लक्ष्मी तांबे यांना सन्मानित करण्यात आले.