चोपड्यात ९ वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 21:53 IST2018-04-13T21:53:39+5:302018-04-13T21:53:39+5:30
जबरे राममंदिर चौकातील विनय रामचंद्र चौधरी (१४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

चोपड्यात ९ वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.१३ : शहरातील जबरे राममंदिर चौकातील विनय रामचंद्र चौधरी (१४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
१३ रोजी संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास विनय चौधरी याने राहत्या घरी छताच्या कडीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विनय हा प्रताप विद्या मंदिर मधील इ.९ वीचा विद्यार्थी आहे. ९ वीची परीक्षा पास होऊन तो दहावीत गेला होता. त्याचे वडील रामचंद्र आनंदा चौधरी हे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे अंगरक्षक आहेत. विनयने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गुरुप्रसाद वाघ यांच्या खबरी वरून चोपडा शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार विद्या इंगळे करीत आहेत.