शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले, तिन्ही काकांना अटक

By सागर दुबे | Updated: April 26, 2023 18:12 IST

आरोपींना २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जळगाव : शहरातील दीक्षितवाडी येथील पियूष नरेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या आईला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या काकांसह ९ जणांनी मारहाण करीत १२ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हिसकविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही काकांना अटक केली आहे. त्यांना २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दीक्षितवाडी भागात माजी नगरसेवक स्व.नरेंद्र भास्करराव पाटील यांचे घर आहे. घरातील पहिल्या माळ्यावर त्यांचा मुलगा पियूष नरेंद्र पाटील हा आई ज्योती यांच्यासह राहतो. तर घराच्या तळ मजल्यावर काका विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील हे राहतात. नरेंद्र पाटील यांचे दि.२९ जुलै २०१८ रोजी निधन झाले. नरेंद्र पाटील यांचे द जळगाव पीपल्स बँक, दाणा बाजार शाखेत वैयक्तिक लॉकर होते. 

नरेंद्र पाटील यांचे निधन झाल्यानंतर बरेच वर्ष लॉकर न वापरण्यात आल्याने त्याबाबत बँकेने नोटीस प्रसिद्ध केली होती. नोटीस वाचल्यानंतर पियूष पाटील यांनी आई ज्योती, बहीण मयुरी आणि स्वतःच्या नावाची कायदेशीर वारस म्हणून नोंद केली. त्यानंतर त्यांना लॉकर उघडण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, बँकेत लॉकर उघडताना दोन वारसांची संमती आवश्यक असल्याचे संजय भास्कर पाटील यांनी पियूष यास कळविले होते.  नंतर ११ ऑक्टोबर २०२२ रोजी संजय पाटील यांनी पियूषला सांगितले की, लॉकर उघडण्याची परवानगी मिळालेली आहे. आपण बँकेत जाऊन दागिने घेऊन येऊ तू कागदपत्रे घेऊन ये. दोघे दुचाकीने बँकेत गेले असता लॉकर मधील दागिने काढून घे आपण याच बँकेत तुझ्या आईच्या नावाने लोकांमध्ये ठेवून देऊ. नंतर ही शाखा लांब होईल आपण दागिने घरामागील गणेशवाडी शाखेत ठेऊन देऊ असे त्यांनी सांगितले. काकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पियूष याने सर्व दागिने काढून प्रक्रिया पूर्ण केली आणि चावी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे परत दिली. लॉकरमध्ये असलेले १२ लाख ४० हजारांचे दागिने आणि आजोबा शंकर जगत पाटील यांचे मृत्युपत्र व स्टॅम्प असे बॅगेत ठेवून दोघे दुचाकीने घरी आले.

बँग घेऊन उठताच केली धक्काबुक्कीआपण घरी चहा घेऊ असे संजय पाटील यांनी सांगितले. त्यावेळी घरात काका विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलेजा नरेंद्र गांगुर्डे असे घरात हजर होते. चहा घेतल्यावर पियूष पाटील बॅग घेऊन उठला आणि मी दागिने बँकेत ठेवून येतो असे त्यांना सांगून निघत असताना काका विजय भास्कर पाटील याने बॅग जबरदस्तीने हिसकावली. दागिने तुझ्या आईच्या नावाने लॉकरमध्ये ठेवायला तुमची काय ठेव आहे का? असे म्हणून धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली. तसेच तुझ्या आईला बोलावून घे तिला पण सांगतो असे बोलून शिवीगाळ केली. पियूष याने आईला बोलवून घेतल्यानंतर इतरांनी घराचे मेन गेट बंद करीत काका व इतरांनी पियूष यास खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या आईला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसात तक्रार केली तर यांना अजून मारा आणि त्यांचा माज उतरवा असे बोलून दोघांना घराबाहेर काढले.

अखेर पोलिस ठाणे गाठले...घडलेल्या प्रकारामुळे ते भयभीत झाले असल्याने पियूष पाटील यांनी आजवर पोलिसात तक्रार दाखल केलेली नव्हती. दरम्यानच्या काळात त्यांनी दागिने परत करण्यासाठी त्यांनी वारंवार विनंती केली मात्र त्यांनी धमकी देत हाकलून दिले होते. अखेर बुधवारी सकाळी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पियूष नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून विजय पाटील, संजय पाटील, मनोज पाटील या तिन्ही काकांना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकtheftचोरी