८ नागरी बँकांनी ठेवीदारांचे २६ कोटी थकवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:02+5:302020-12-04T04:45:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील १३ नागरी बँकांपैकी ८ बँक ह्या अवसायनात गेल्या आहेत. सध्या या बँकांकडे ठेवीदारांचे २६ ...

८ नागरी बँकांनी ठेवीदारांचे २६ कोटी थकवले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव
जिल्ह्यातील १३ नागरी बँकांपैकी ८ बँक ह्या अवसायनात गेल्या आहेत. सध्या या बँकांकडे ठेवीदारांचे २६ कोटी १६ लाख रुपये थकले आहेत.
तर या बँकांचे कर्ज वसुली ९० कोटींच्यावर शिल्लक आहे. आता या या ठेवीदारांचे पैसे कधी मिळतील असा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील एकेकाळी अनेक अग्रगण्य म्हणवल्या जाणाऱ्या नागरी बँका अवसायनात गेल्या. आर्थिक अडचण आल्यावर योग्यवेळी कर्जवसुली न करणे यासोबतच ठेवींच्या रकमा वेळेवर परत न करणे. संचालक मंडळातील मर्जीच्या लोकांना नियमबाह्य कर्ज देणे त्याची वसुली न झाल्याने या बँका अवसायनात गेले आहेत.
सहकार विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार ८ बँकांची देय ठेव २६ कोटी १६ लाख रुपये आहे. तर कर्ज वसुली ९० कोटी २८ लाख रुपये आहे.
यातील चाळीसगाव चा एका बँकेकडे सुमारे दहा कोटी रुपयांचे देय ठेवी आहेत. मुदत उलटून गेल्यावरही या ठेवींच्या रक्कम ठेवीदारांना देण्यात आलेली नाही. तर जळगाव शहरातील एका बँकेकडे पाच कोटी २५ लाख रुपयांच्या ठेवींची मुदत उलटून गेली आहे.
या संस्थांवर अवसायक आल्यापासून थकीत कर्ज पैकी मुद्दल व व्याज मिळून ५३ कोटी १८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.
पतसंस्थांची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू
जिल्हा सहकार विभागाकडे सध्या जळगाव,भुसावळ, रावेर आणि यावल या तालुक्यातील १२ पतसंस्थांचे माहिती आहे त्याशिवाय इतर पतसंस्थांची माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरु आहे जिल्ह्यात सध्या ६१० पतसंस्था आहेत तर त्यातील तब्बल १५४ पतसंस्था अवसायनात गेले आहेत त्यातील ३७ पतसंस्थांवर प्रशासक आहेत. आणि एकशे दहा पतसंस्था आर्थिक अडचणीत आले आहेत.